शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 17:21 IST

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती. गरज भासल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी.

ठळक मुद्देमुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती.गरज भासल्यास पुन्हा सेंटर सुरू करण्याची तयारी.

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर १ जुलैपासून बंद करण्यात आले असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढल्यास हे सेंटर पुन्हा सुरु केले जाईल असेही पाटील यांनी नमूद केले.महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादूर्भाव मार्च 2०२० मध्ये सुरु झाला. महापालिकेकडे दोन बडी रुग्णालये आणि १५ हेल्थ सेंटर होते. मात्र  पुरेसा डॉक्टर, नर्सचा स्टाफ नसल्याने त्याठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार कसे करायचे असा प्रश्न होता.

जंबो कोविड सेंटर लगेच तातडीने उभारणो शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी टाटा आमंत्रा या बड्या गृहसंकुलात कोविड केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी महापालिकेस दिली. १ एप्रिल २०२०  पासून टाटा आमंत्रा येथे कोविड केअर सेंटर सुरु झाले. या कोविड सेंटरची क्षमता ३ हजार रुग्णांवर उपचार करण्याची होती.  गेल्या वर्षभरात एका दिवसात २५०० रुग्ण उपचार घेत होते. हा या कोविड सेंटरचा उच्चंक ठरला. महापालिका हद्दीतील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोविड केअर सेंटरची कामगिरी मोलाची ठरली. दिवसाला दोन हजार रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि राहण्याची उत्तम सोय ती स्वतंत्र फ्लॅटमध्ये केली होती. उद्यापासून हे कोविड सेंटर बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर चालविले जाणार आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर सुरु केले जाईल असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

तिसरी लाट पाहता रुक्मीणीबाई रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात येणार आहे. त्याठिकाणचा प्रसूती विभाग वसंत व्हॅली येथील सुतिका गृहात स्थलांतरीत केला जाणार आहे. उद्यापासून वसंत व्हॅली येथे प्रसूतीसाठी महिलाना पाठविण्यास सुरुवात केली जाणार आहे. जोर्पयत हे सगळ्य़ाना ज्ञात होत नाही. तोर्पयत तातडीची प्रसूतीची केस आल्यास ती रुक्मीणीबाई रुग्णालयात केली जाईल. टाटा आमंत्रा कोविड  केअर सेंटर बंद करण्यात आल्याने त्याठिकाणचे १५ डॉक्टर, २७ नर्सेस, ४१ वार्डबॉय हे वसंत व्हॅली आणि रुक्मीणीबाई रुग्णालयात शिफ्ट केले जाणार आहेत.

कोरोना सद्य स्थितीकोरोना पॉझिव्हीटी रेट-२.४० टक्केकोरोना डेथ रेट-१.९० टक्केरुग्ण बरे होण्याचा रेट-९७.३२ टक्केआजमितीस दिवसाला अॅन्टीजेन आणि आरटीपीसीर टेस्टचे प्रमाण - ३०००

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस