कल्याणमध्ये सूर्य नमस्कार अनुष्ठान
By अनिकेत घमंडी | Updated: August 19, 2023 16:30 IST2023-08-19T16:30:20+5:302023-08-19T16:30:51+5:30
कल्याण येथील नमस्कार मंडळ या संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही १ लक्ष सूर्य नमस्कारांचे अनुष्ठानाचा शुभारंभ झाला आहे.

कल्याणमध्ये सूर्य नमस्कार अनुष्ठान
कल्याण येथील नमस्कार मंडळ या संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही १ लक्ष सूर्य नमस्कारांचे अनुष्ठानाचा शुभारंभ झाला आहे. शहरातील व्यायामप्रेमी रोज सकाळी ६ ते ८ या वेळात नमस्कार मंडळाच्या आग्रारोड व स्वानंद नगर येथील व्यायामशाळेत येवून सूर्य नमस्कार घालत आहेत.
विविध शाळा व सामाजिक संस्था अशा ४० विविध ठिकाणीही हा सूर्य नमस्कार यज्ञ सुरू झाला असून विद्यार्थी-विद्यार्थीनी, तरूण-तरूणी, स्त्री-पुरुष सर्वांनी रोज किमान १३ समंत्रक सूर्यनमस्कार घालावेत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिपक तेलवणे यांनी केले आहे. माजी आमदार श्री नरेंद्र पवार हे रोज व्यायामाबरोबर सूर्यनमस्कार घालत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी दिली.