शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कल्याण-डोंबिवली मनपाअंतर्गत येणाऱ्या 'त्या' 27 गावातील कर वाढीविरोधात संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 8:04 PM

27 गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती. 2015 साली गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. या गावांचा कर वाढविणे अयोग्य आहे. या मुद्यावर संघर्ष समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे.

कल्याण -कल्याण डोंबिवली महापालिकेने 27 गावातील नागरीकांना मालमत्ता कर दहा पटीने जास्त लावला आहे. ही करवाढ अन्यायकारक असून ती रद्द करण्यात यावी. अन्यथा महापालिकेच्या विरोधात मालमत्ता कराची होळी आंदोलन करण्याचा इशारा 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने महापालिकेच्या आयुक्तांना दिला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, अजरून चौधरी, रंगनाथ ठाकूर, दत्ता वझे, गजानन मांगरुळकर आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. 27 गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती. 2015 साली गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. या गावांचा कर वाढविणे अयोग्य आहे. या मुद्यावर संघर्ष समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. 27 गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी होती. ही मागणी समितीने वारंवार लावून धरली. त्यावर समिती आजही ठाम आहे. दरम्यान विद्यमान महाविकास आघाडी सरकारने 27 पैकी 18 गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची प्रक्रिया सुरु केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थीतीत गेल्या दोन वर्षापासून गावातील जनता कोरोनामुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्यांच्यावर दहापटीने लादलेला मालमत्ता कर ते भरु शकत नाही. हा कर रद्द करावा. 

महापालिका दहा पटीने कर वसूल करते. त्या बदल्यात 27 गावात महापालिकेकडून सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. रस्ते अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे आहे. 27 गावातील अनेक गावांना पाण्याचा  प्रश्न भेडसावत आहे. या महत्वपूर्ण समस्यांमुळे 27 गावातील नागरीक त्रस्त आहे. याकडे काल भाजप आणि मनसे आमदारांनी लक्ष वेधले आहे. त्या पाठोपाठ आज पुन्हा संघर्ष समितीने आयुक्तांची भेट घेऊन दहा पटीने लागू केलेला मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लवकर मालमत्ता कराची होळी आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीने आयुक्तांना दिला आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणTaxकर