ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश
By मुरलीधर भवार | Updated: February 6, 2024 19:57 IST2024-02-06T19:56:57+5:302024-02-06T19:57:47+5:30
राज्य सरकारने नागरीकाना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याकरीता सूचित केले आहे.

ऑनलाईन-ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा; KDMC आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश
कल्याण: राज्य सरकारने नागरीकाना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याकरीता सूचित केले आहे. या सेवांची ऑनलाईन/ऑफलाईन सेवांची काटेकोरपणे अंमलबजवणी करा असे आदेश आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शासनाकडीलएकुण १०७ सेवा अधिसूचित केल्या आहेत. यामध्ये मालमत्ता कर विभागाकडील सेवा, पाणी पुरवठा विभागाकडील सेवा, जन्म मृत्यू नोंदणी विभागाकडील सेवा, नगररचना विभागाकडील सेवा, बाजार व परवाना विभागाकडील सेवा, विवाह नोंदणी विभागाकडील सेवा, जलनि:सारण विभागाकडील सेवा, उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडील सेवा, बांधकाम विभागाकडील सेवा, मालमत्ता विभागाकडील सेवा, अग्निशमन विभागाकडील सेवा आदी सेवा महापालिकेकडून देण्यात येत आहेत.
या सेवा नागरीकांना पुरविण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करणारे पदनिर्देशित अधिकारी तसेच ती सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलिय अधिकारी आणि द्वितीय अपिलीय अधिकारी यांच्यासाठी नियत कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेमार्फत नागरीकांना देण्यात येणा-या १०७ लोकसेवांचा तपशिल महापालिकेच्या www.kdmc.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.