शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षा पास झाल्यावर समोर आली अजब बाब, विद्यार्थ्याने थेट लिहिले हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 17:03 IST

Kalyan News : आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा झाला असता आत्ता त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कल्याण - बीएड्, एमएड् इंटिग्रेटेडच्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेण्याकरीता कल्याणच्या यशोधन ओक या तरुणाने सीईटीची परिक्षा दिली. ओक परिक्षाही उत्तीर्ण झाले. आत्ता त्यांना या अभ्यासक्रमाची सोय मुंबई विद्यीपाठात नाही. हा अभ्यासक्रम कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिकविला जातो. त्याठिकाणी जा असे सांगण्यात येत आहे. या अजब प्रकारामुळे ओक यांनी थेट या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहीले आहे.आधीच कोरोनामुळे विद्याथ्र्याच्या शैक्षणिक भवितव्याचा खेळखंडोबा झाला असता आत्ता त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोर्सच उपलब्ध नसल्याने ओक यांच्यासारख्या सीईटी परिक्षा उत्तीण झालेल्या असंख्य विद्याथ्र्याचे हे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. यशोधन हे इंग्रजी साहित्य विषयातून पदव्युत्तर शिक्षित आहे. त्यांना काही कायम स्वरुपाची नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे ते कल्याणमध्ये १० ते १२ वीच्या विद्याथ्र्याना इंग्रजी भाषा विषय शिकविण्याचे काम करुन काम भागवित आहेत. त्यांनी बीएड् आणि एमएड् इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाकरीता आवश्यक असलेली सीईटी परिक्षा २७ ऑक्टोबर रोजी दिली. त्यात ते उत्तीण झाली. त्यांनी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ३० डिसेंबर रोजी अर्ज भरला. त्या अर्जावर मुंबई विद्यापीठाचा पर्यायच नव्हता. त्याठिकाणी केवळ एच पर्याय दर्शविण्यात आला होता. तो म्हणजे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ. हा पर्याय पाहून ओक यांना धक्काच बसला. त्यांनी अधिक चौकशी केली असता हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठा नाही असे सांगण्यात आले. सीईटी परिक्षा उत्तीण झालेल्या त्यांच्या सारख्या असंख्य विद्याथ्र्यानाही असाच धक्का बसला. लॉकडाऊनमुळे जगणो मुश्कील झालेले आहे. त्यात कोणच्याही हाती पैसा नाही. त्यात उच्च शिक्षण कसे काय घ्यायचे असा प्रश्न आहे. अभ्यास करुन सीईटी पास झालेले ओक यांनी सांगितलेकी, कोल्हापूर येथे कसे जायचे. त्याठिकाणी राहण्याची आणि विद्यावेतनाची सोय काही नाही. हे सगळे प्रश्न आहे. कोल्हापूरचा एकच पर्याय टाळला तर हे शैक्षणिक  वर्ष फूकट जाणार आहे.ओक यांनी सीईटी सेलकडेही या बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडन सांगण्यात आले की,ब्रोशर्सवर कॉलम नंबर ४७ मध्ये मुंंबई विद्यापीठात हा अभ्यासक्रम नाही आहे. मात्र ओक यांच्या मते ब्रोशर्सवरील इतक्या बारीक तपशीलात विद्यार्थी गेलेले नाही. त्यामुळे ओक यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. मुख्य न्यायाधीश ओक यांच्या पत्रची काय दखल घेतात हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीMumbai Universityमुंबई विद्यापीठMumbai High Courtमुंबई हायकोर्ट