शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

डोंबिवलीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 20 लाखाची मदत करावी; आठवलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:00 IST

केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मंत्री आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला आहे.

कल्याण - मुंबईतील साकीनाका बलात्कारापेक्षा डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 20 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली. (The state government should help Rs 20 lakh to the families of rape victims in Dombivli; says ramdas athawale)

केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मंत्री आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला आहे. डोंबिवलीतील नागरीकांनी पुढे येऊन या पीडितेच्या कुटुंबांला आर्थिक मदत करावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. याचबरोबर, सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. मात्र साकीनाका प्रकरणापेक्षा हे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला साकीनाका प्रकरणाप्रमाणेच 20 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने करावी.

दिल्लीत झालेल्या निर्भया  प्रकरणाच्यावेळी मी संसदेत होतो. अशा गंभीर स्वरुपाच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असा कायदा केंद्र सरकारने केला आहे. या प्रकरणातील 33 आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी. येत्या सहा महिन्यात हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा दिली जावी. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या वतीने निषेध करतो, असे मंत्री आठवले यांनी यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMolestationविनयभंगState Governmentराज्य सरकार