शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे प्रकल्पाचा आर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार तयार, प्रमोद हिंदूराव यांनी अजित पवार यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 18:00 IST

कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा राज्य सरकारचा अर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार तयार असल्याचे राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आश्वासीत केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आज दिली.

कल्याणकल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा राज्य सरकारचा अर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार तयार असल्याचे राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आश्वासीत केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आज दिली. अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी अभिनंदन केले आहे. 

कल्याण-मुररबाड-माळशेल या रेल्वे मार्ग प्रकल्प हा 45 वर्षापासून रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी राष्ट्रवादीने कल्याणमध्ये कल्याण-नगर रेल्वे मार्गासाठी परिषदही घेतली होती. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या तेव्हापासून हा पाठपुरावा सुरु आहे. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते मुंबईत ऑनलाईनद्वारे करण्यात आले होते. भूमीपूजन होऊन 3 वर्षे उलटून गेली तरी या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही. मात्र राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थ संकल्प सादर केला. या अर्थ संकल्पात त्यांनी कल्याण मुरबाड मालशेज रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आर्थिक भार उचलण्यास तयार असल्याचे आश्वासीत केले असल्याची माहिती प्रमोद हिंदूराव यांनी दिली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी किमान दोन  हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वे प्रकल्पाचा राज्य आणि केंद्र सरकार अर्धा खर्च उचलते. त्यानुसार राज्य सरकारचा आर्थिक भार उचलण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आहे.

कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागल्यास मुरबाड नगरहून येणारा शेतमाल कल्याण बाजारपेठेत वेळेत पोहचविणे शक्य होईल. रेल्वेचा प्रवास स्वस्त असतो. त्याचबरोबर या भागातील विद्यार्थ्यांना कल्याणमध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी सोय होईल या विविध गोष्टींंचा फायदा नागरिकांना होणार असून, कल्याण मुरबाड नगर हे रेल्वेने जोडले जाईल असे हिंदूराव यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणmurbadमुरबाडrailwayरेल्वे