शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलाने केली आईची निर्घृण हत्या; शवविच्छेदन अहवालानंतर फुटली वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 09:51 IST

कोळसेवाडी पोलिसांना पूर्वेतील हनुमाननगर परिसरात एका घरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या घटनेचा तपास सुरू केला.

कल्याण: व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह घरात लटकवून तिने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र, या हत्येचे बिंग शवविच्छेदन अहवालानंतर उघडकीस आले. ही आत्महत्या नसून मुलानेच आईची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी मुलगा रवी पुमणी (वय ३४) याला अटक केली आहे.कोळसेवाडी पोलिसांना पूर्वेतील हनुमाननगर परिसरात एका घरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या घटनेचा तपास सुरू केला. मृत महिला सरोजा पुमणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी रवी याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत तो व्यसनाधीन असल्याचे समजले. तो नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी तो आईशी भांडण करायचा. सोमवारी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी रवीला दुखापत झाली.रवीने गळा आवळून आईची हत्या केली. ते लपविण्यासाठी रवीने आईचा मृतदेह घरात लटकवून तिने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र, कोळसेवाडी पोलिसांच्या सखोल तपासाअंती ही हत्या असल्याचे उघडकीस आली आहे.

हत्येनंतर बहिणीला फोन आईची हत्या केली तेव्हा रवीने त्याच्या बहिणीला मध्यरात्रीस फोन केला होता. मात्र, रात्री येणे शक्य नसल्याचे त्याच्या बहिणीने सकाळी येते, असे सांगितले होते. त्याची बहीण व मेहुणे हे सकाळी घरी गेले. तेव्हा रवीने दार उशिरा उघडले होते, ही माहिती देखील पोलिसांनी सांगितली. 

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस