ओबीसी आरक्षणावर जिल्ह्याचे खासदार, आमदारांचे मौन; ओबीसी समाजाची खंत 

By मुरलीधर भवार | Updated: September 13, 2023 18:59 IST2023-09-13T18:59:14+5:302023-09-13T18:59:32+5:30

ओबीसी आरक्षणाचा कोटा कमी करु नये या मुद्याकडे जाधव यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

Silence of district MPs, MLAs on OBC reservation Regret of OBC community | ओबीसी आरक्षणावर जिल्ह्याचे खासदार, आमदारांचे मौन; ओबीसी समाजाची खंत 

ओबीसी आरक्षणावर जिल्ह्याचे खासदार, आमदारांचे मौन; ओबीसी समाजाची खंत 

कल्याण: मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोधात नाही. तर ओबीसी संवर्गातील कुणबी यांचे आरक्षण हिरावून घेऊन ते मराठा समाजाला देण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका कल्याण तालुका ओबीसी महासंघोन घेतली आहे. मात्र ओबीसी असलेले ठाणे जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी या विषयावर मौन बाळगले असून त्यांनी साधी प्रतिक्रियाही उमटली नसल्याची खंत कल्याण तालुका ओबीसी महासंघाचे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

या मागणीसठी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी कुणबी समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने कल्याणच्या तहसीलदार जयराज देशमुख यांना एक निवेदन सादर केले. समाजाची काय मागणी आहे ती राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यात यावी असे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. 

ओबीसी प्रवर्गात ३४६ जाती येतात. ओबीसींना एकूण १९ टक्के आरक्षण मिळते. हे आरक्षण काढून ते मराठा समाजाला दिल्यास ते ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावून घेतल्या सारखे होईल. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा वेगळा विचार करुन त्यांना आरक्षण द्यावे. ओबीसी आरक्षणाचा कोटा कमी करु नये या मुद्याकडे जाधव यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Silence of district MPs, MLAs on OBC reservation Regret of OBC community