ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत कल्याणची सिया सपालिगा ठरली सेकंड रनर
By मुरलीधर भवार | Updated: January 15, 2024 14:54 IST2024-01-15T14:53:41+5:302024-01-15T14:54:21+5:30
कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत कल्याणची सिया सपालिगा ठरली सेकंड रनर
मुरलीधर भवार, कल्याण-कल्याणमध्ये राहणारी सिया सपालिगा ही ज्युनिअर मिस इंडिया स्पर्धेत सेकंड रनर ठरली आहे. अंधेरी येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत सिया सहभागी झाली होती. ही स्पर्धा देशपातळीवरील हाेती. सिया या स्पर्धेत सेकंड रनर ठरल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सिया ही कल्याणच्या बिर्ला स्कूलमध्ये इयत्ता आठवीच्य वर्गात शिकते. तिला फॅशन आणि टीव्ही सिरियलची आवड आहे. यापूर्वीही तिने विविध ठिकाणी पार पडलेल्या नामांकित सर्धेत दाेन वेळा यश मिळविले आहे. यावेळी ती अंधेरी येथील कंट्री क्लब येथे पार पडलेल्या ज्युनि्अर मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिला दोन वेळा यश मिळाले असून ती सेकंड रनर ठरली आहे. सियाचे वडिल विठ्ठल सपालिगा हे हॉटेल व्यावसायिकआहे. तसेच सियाची आई गृहिणी आहे. आई वडिलांची प्रेरणा आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सियाला स्पर्धेत यशस्वी होता आले असे सियाने सांगितले.