कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन
By मुरलीधर भवार | Updated: March 28, 2024 19:15 IST2024-03-28T19:13:39+5:302024-03-28T19:15:18+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज कल्याणमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज कल्याणमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शहर प्रमुख रवी पाटील,माजी नगरसेवक मयुर पाटील आदी शिवसैनिक शिवजयंतीच्या मिरवणूकीत सहभागी झाले होते. तर दुसरीकडे शिवसेना ठकरे गटाचे नेते विजय साळवी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मिरवणूकीतही ठाकरे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
कल्याण पश्चिम मतदार संघ हा भिवंडी लोकसभेत येतो. भिवंडी लोकसभेतून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले उमेदवार बाळ्या मामा मिरवणूकीत सहभागी झाल होते. विविध देखावे, ढोल ताळे, ब’न्जो बाजा आणि आदिवासी नृत्य अशा भरगच्च कार्यक्रमांनी दोन्ही गटाकडून जाेरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.