शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 07:17 IST

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील वास्तव

- सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शासनाने मोफत उपचाराचा घेतलेला निर्णय व शासकीय अनुदानाअभावी मध्यवर्ती रुग्णालयासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठणाट झाला. त्यामुळे रुग्णांवर विनाऔषध राहण्याची वेळ आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. स्थानिक औषध दुकानदारांनी वाढत्या थकबाकीमुळे औषध देण्यास व ऑक्सिजन, नायट्रेट व स्पिरिट रिफिल करण्यास नकार दिल्याने, मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे. या दुकानदारांचे तब्ब्ल ५५ लाखांचे बिल थकले आहे.

उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाण्याचे प्रमुख डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय ठाणे प्रमुख डॉ. कैलास पवार यांनी आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई व सहसंचालक आरोग्य सेवा आरोग्य भवन मुंबई विभागाला ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती दिली. सामान्य जिल्हा रुग्णालय ठाण्यासाठी १२ कोटी तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी २ कोटी तसेच औषध थकबाकीसाठी ५५ लाखांची मागणी केली.

अन्यथा अनर्थ होण्याची भीती मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रोज १५०० रुग्णांची नोंद असून, आंतररुग्णांची संख्याही क्षमतेपेक्षा जास्त आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून होणारा औषधपुरवठा ९० टक्के कमी झाला असून, मध्यवर्ती रुग्णालयाने स्थानिक दुकानांकडून खरेदी केलेल्या औषधांची थकबाकी ४० लाखांवर गेली.नऊ लाखांचे ऑक्सिजन, नायट्रेट बिल आहे. दुकानदारांनी थकबाकीचे कारण देऊन ऑक्सिजन, नायट्रेट, स्पिरिट रिफिल देण्यास मनाई केल्याने अनर्थ होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. 

रुग्णांच्या उत्पन्नावर गदाnरुग्णालयाला रुग्णांनी काढलेल्या केसपेपरमधून महिन्याला ५ ते ६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यातून स्थानिक दुकानातून औषधांची खरेदी केली जात होती.nमोफत उपचार देण्याच्या निर्णयामुळे हे उत्पन्न बंद झाले व अनुदानही मिळत नसल्याने रुग्णालयांची कोंडी झाली.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना लिहीले पत्रमध्यवर्ती रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे अनर्थ घडल्यास, त्याला डॉक्टर जबाबदार नाहीत. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी आ. कुमार आयलानी यांना दिली. त्यानंतर आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना परिस्थितीची माहिती देऊन औषध व अनुदानाची मागणी केली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल