शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

"काम करूनच टीकेला उत्तर द्यावे लागते", श्रीकांत शिंदेंचा मनसेला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 13:48 IST

Shivsena Shrikant Shinde And MNS : रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन हे काम करायचे होते. त्याचे गर्डर ४५ दिवसांत हैदराबाद येथे तयार केले गेले.

कल्याण - कल्याण पत्रीपुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना पत्रीपुलाच्या अ‍ॅप्रोच रोडचे काम केले गेले नसल्याची टीका मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केली होती. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, काम करूनच टीकेला उत्तर द्यावे लागते. विरोधकांनी कन्स्ट्रक्टिव्ह माईडने काम करावे, असा टोला मनसेला लगावला आहे.

डॉ. शिंदे म्हणाले की, पत्रीपुलाच्या कामात विलंब झाला आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाला सोबत घेऊन हे काम करायचे होते. त्याचे गर्डर ४५ दिवसांत हैदराबाद येथे तयार केले गेले. ते आणण्याआधीच लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर पावसाने जोर धरला. तेलंगणा सरकारकडून परवानगी घेऊन गर्डर आणले गेले. पत्रीपुलाचे काम होत असताना त्याचे स्वागत करण्याऐवजी टिका करण्यात काय मतलब आहे. नागरिकांमध्ये नाराजी होती. विरोधकांनी त्यावर गाणी तयार केली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जबाबदारीपूर्वक काम करावे लागते. काहीही करून चालत नाही. त्यावर मात करत हे काम पूर्ण केले जात आहे. त्याचे कौतुक विरोधकांनी करणे अपेक्षित होते. त्यांच्याकडून केली जात आहे. त्यांचे काम त्यांना करू द्या, असे शिंदे यांनी सुनावले आहे.

 ...तर वेळेत काम झाले असते

पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर वेळेत पुलाचे काम झाले असते असा टोला मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे. पत्रीपुलाचे काम रविवारी पूर्ण झाले नाही. आता या कामासाठी पुन्हा मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. रेल्वेच्या परिसरात पूल तयार करायचे असतीलतर मेगाब्लॉक घ्यावे लागतात ते मुश्कीलीने मिळतात. कारण त्यामुळे बऱ्याचशा रेल्वेच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात. रेल्वे शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा मेगाब्लॉक पत्रीपुलाच्या कामासाठी दिला होता. शनिवारी पुलाच्या खाली जाऊन, इंजिनिअर घालतात तशा कॅप घालून बाईट दिल्या नसत्या तर वेळ वाया गेला नसता यात आजचे काम पूर्ण झाले असते, अशी टीका पाटील यांनी केली.

 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेMNSमनसेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याणRaju Patilराजू पाटील