शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

BJP MLA Ganpat Gaikwad उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच शिवसेना नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 23:57 IST

Ganpat Gaikwad ( Ulhasnagar Firing Latest News ) उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.

उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. 

दरम्यान, या घटनेत शिवसेना नेते महेश गायकवाड जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलीस निरिक्षकांच्या केबीनमध्ये या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी हा गोळीबीर झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेली माहिती अशी,  शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये एका विषयावर वाद होऊन कल्याण शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व  गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना  २ गोळ्या लागल्या आहेत. यांप्रकाराने खळबळ उडून दोन्ही गटाच्या  समर्थकांनी एकच गोंधळ पोलीस ठाणे व परिसरात घातला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या  हाणामारी झाल्याचे प्रकार झाले. असे पोलिसांचे म्हणणे आहे.  आमदार गणपत गायकवाड व सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महेश गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या असून दोन गोळ्या उजव्या खांद्यावर एक गोळी पाठीवर आणि एक गोळी मांडीवर लागली आहे. महेश गायकवाड गंभीर जखमी असून त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्या खांद्यावर आणि हाताला गोळी लागली आहे. दरम्यान त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडPoliceपोलिसMahesh Gaikwadमहेश गायकवाड