शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये; मनसे आमदाराला शिवसेना नेत्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 16:16 IST

रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी काल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिला होता.

कल्याण - कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाही. रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी काल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिला होता. यानंतर आता, शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असा टोला मनसे पाटील यांना लगावला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने आली आहे. (Shiv Sena leader commented on MNS MLA Raju patil over Pothols)शिवसेना माजी नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 2010 सालच्या निवडणूकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. 2015 साली मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हा खड्डय़ात गेलेला पक्ष आहे. त्याने कुणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये. मनसेचेही नगरसेवक महापालिकेत होते. त्यांनी का खड्डे प्रकरणी कधी आवाज उठविला नाही असा सवालही म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.  2014 साली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामावर 21 कोटी रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर महापालिका हद्दीत काही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्यात आले. त्यामुळे 2014 सालानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी-कमी होत गेला. रस्ते विकासासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे 360 कोटीची रस्ते विकासाची कामे लवकर सुरु होणार आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्यावरील खर्च आणखीन कमी होऊ शकतो असा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलShiv SenaशिवसेनाMNSमनसेPotholeखड्डे