शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना ६९, भाजप ५३ जागांचा शिंदेसेनेचा प्रस्ताव : दोघेही ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत युती करण्याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेत युती करण्याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपने १२२ पैकी ८३ जागा मागितल्या. तर शिंदेसेनेकडे ६९ माजी नगरसेवक असून, भाजपकडे ५३ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे हे वास्तव स्वीकारून युती करावी, असे शिंदेसेनेचे म्हणणे आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. बैठकीचा पहिला दिवस चहापानावरच मावळला. 

कल्याणमध्ये ओक बागेत झालेल्या बैठकीला भाजपतर्फे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नरेंद्र पवार, राहुल दामले हे तर शिंदेसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आ. राजेश मोरे, नीलेश शिंदे, रवी पाटील आदी हजर होते.

असे होते चर्चेतले पर्यायभाजपने मागितल्या ८३ जागा व उर्वरित ३९ शिंदेसेनेने घ्याव्यात, असा पर्याय मांडला. त्याला शिंदेसेनेने नकार दिला.शिंदेसेनेने दिलेल्या पर्यायात त्यांच्याकडे ६९ माजी नगरसेवक आहेत, तर भाजपकडे ५३ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला स्वीकारावा आणि युती करावी, असा प्रस्ताव शिंदेसेनेने भाजप समोर ठेवला. त्याला भाजपने नकार दिला.हा पर्याय नको असेल तर आता दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षात जे आयात केलेले उमेदवार आहेत, त्यात जो कोणी तुल्यबळ असेल त्याला उमेदवारी द्यावी व तिढा सोडवावा, असा प्रस्ताव मांडला.महापालिका निवडणुका २०१५ मध्ये झाल्याने आता युतीची चर्चा शून्यापासून करणे आवश्यक आहे. भाजपकडे सध्या ५१ व शिंदेसेनेकडे ४९ माजी नगरसेवक आहेत, हे वास्तव स्वीकारून या १०० जागा वगळता उर्वरित २२ जागांवर समसमान वाटप करायचे, असा प्रस्ताव चर्चेत पुढे आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena offers 69 seats, BJP 53: Stalemate in alliance talks.

Web Summary : BJP and Shinde Sena's alliance talks for Kalyan-Dombivli elections hit a deadlock. BJP demanded 83 seats, while Shinde Sena proposed a 69-seat share based on their existing corporators. No consensus was reached, and discussions ended inconclusively.
टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६