विविध समस्या सोडविण्याकरीता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची केडीएमसी आयुक्तांना भेट
By मुरलीधर भवार | Updated: November 30, 2023 17:25 IST2023-11-30T17:24:44+5:302023-11-30T17:25:59+5:30
कल्याण : कल्याण पूर्वेतील विविध समस्या मांडण्याकरीता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची ...

विविध समस्या सोडविण्याकरीता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची केडीएमसी आयुक्तांना भेट
कल्याण: कल्याण पूर्वेतील विविध समस्या मांडण्याकरीता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची आज भेट घेतली.
कल्याण पूर्वे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, विधानसभा समन्वयक मल्लेश शेट्टी, शिवसेना उपशहर प्रमुख नवीन गवळी आणि माजी नगरसेवक पप्पू पिंगळे आदी उपस्थित होते.शहर प्रमुख गायकवाड यांनी सांगितले की, कल्याण पूर्वेत झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. येणाऱ्या काळात कल्याण पूर्वेची अजून दयनीय अवस्था होऊ नये. त्यासाठी या समस्या साेडवा अशी आग्रही मागणी केली. त्या बरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे झाली पाहिजेत. जे रस्ते सहा फुटाचे आहेत. ते नऊ फूटाचे करण्यात यावेत. जे रस्ते नऊ फूटाचे आहे. ते १२ फूटाचे करण्यात यावेत. अनेक भागात पाणी कमी दाबाने येते. या विविध समस्या सोडविण्यात याव्यात. विधानसभा प्रमुख शिंदे यांनी सांगितले की, कल्याण पूर्वेतील अनेक प्रभागात कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे कचऱ््याची समस्या आहे. कचरा वेळेवर उचलला जावा. नागरीकांना त्याचा त्रास होता कामा नये. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.
दरम्यान पाणी सोडणारे महापालिकेचे व्हा’ल्वमन आहेत. त्यांना सण आणि सार्वजनिक सुट्ट्या मिळतात. त्यांच्या अन्य सुट्या नियमित केल्या जात नाहीत. सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना बदली रजा दिली जावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी आयुकतांकडे केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी गायकवाड यांना दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.