शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील शीतला देवीला तब्बल १५० वर्षांची परंपरा; तीन पिढ्यांपासून केली जाते पूजाअर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 10:22 IST

नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीला अभिषेक केला जातो. नऊ दिवस देवीचे पाठ वाचले जातात.

- मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रसिद्ध शीतला देवीचे मंदिर आहे. हा चौक तयार होण्यापूर्वी या भागाची शीतला देवी ही भौगोलिक खूण (लँडमार्क) होते व आजही आहे. शीतला देवी मंदिर हे १५० वर्षे जुने आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून याठिकाणी शीतला देवीची पूजाअर्चा केली जाते.

गोविंद गणपत पानेरकर (कुंभार) हे या देवीची सुरुवातीला उपासना आणि पूजा करीत होते. ते घेसर येथील असले तरी ते कल्याणच्या मुख्य बाजारपेठ परिसरात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पूजा करण्याचा मान त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर पानेरकर यांच्याकडे आला. 

देणगीतून मंदिराची होते दुरुस्तीनवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीला अभिषेक केला जातो. नऊ दिवस देवीचे पाठ वाचले जातात. नवमीला नवचंडिका होम असतो. मंदिरात शीतला देवीच्या मूर्ती शेजारी गावदेवीची मूर्ती आहे. कल्याणची गावदेवी अर्थात ग्रामदैवत शीतला देवीच्या सोबत पुजली जाते. भक्तांनी दानपेटीत टाकलेले पैसे आणि स्वखुशीने दिलेल्या देणगीतून मंदिराची देखभाल, दुरुस्ती आणि रंगरंगोटी, प्रसाद, देवीच्या पूजनाचा खर्च भागवला जातो.

    आता गुरुनाथ पानेरकर हे देवीची पूजा करतात. वंश परंपरागत देवीचे पूजन सुरू आहे. शीतला देवी ही स्वयंभू आहे. देवीच्या बाबतीत एक आख्यायिका आहे. देवी जेव्हा तहान-भुकेली होती तेव्हा तिला कुंभारांनी दही, दूध, भात आणि पाणी दिले होते.     त्यावेळी शीतला देवी प्रसन्न झाली. तिची सेवा कुंभारांकडून केली जाईल, असे त्याच वेळी तिने जाहीर केले. गुरुनाथ पानेरकर हे मूळचे कुंभार. आता त्यांचा व्यवसाय कुंभारवाड्यात मातीचे काम करणे नसला तरी ते सध्या मंदिराच्या शेजारीच हार-फूल विक्रीचा व्यवसाय करतात. मंदिराचा मालकी हक्क हा गुरुनाथ पानेकर यांच्याकडेच आहे. लहान मुलांना कांजण्या, गोवर आला तर अनेक भक्त देवीची ९ ते ११ दिवस उपासना करतात. त्यांच्या मुलांचा कांजण्या, गोवर बरा होतो, अशी भाविकांची धारणा आहे.    कल्याणमधील शीतला देवी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असल्याने अनेक चाकरमानी कामावर जाण्यापूर्वी देवीचे दर्शन घेऊन मुंबईची वाट धरतात. जागृत देवस्थान असल्याने बहुतांश भाविक देवीची खणा नारळाने ओटी भरतात.  

टॅग्स :Navratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्री