शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

उड्डाणपुलाचे सात गर्डर डोंबिवलीत दाखल; शिवसेनेकडून नारळ फोडून कामाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:02 IST

भाजपची दिरंगाईवरून टीका

डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाचे २१ पैकी सात गर्डर सोमवारी पहाटे डोंबिवलीत दाखल झाले.  त्याचा शिवेसना पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून आनंद व्यक्त केला. त्यानंतर मात्र आयुक्तांसमोरच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरत कामात दिरंगाई झाल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. तीन टप्प्यात गर्डर बसवण्यात येणार आहेत. 

शहराला पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा उड्डाणपूल धोकादायक झाल्याने मध्य रेल्वेने २०१९ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. अगोदर पूल बंद करून लॉकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० मध्ये पाडण्यात आला. ४५ मीटर पुलाचे काम संथ गतीने सुरू होते. लॉकडाऊननंतर कामाला वेग आला. आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन टप्प्यात या पुलाचे २१ गर्डर बसविले जाणार आहेत. 

शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि पदाधिकारी राजेश कदम यांनी घरडा सर्कल येथे जाऊन सकाळी सहा वाजता नारळ फोडून त्याबद्दल आनंद व्यक्त केला. म्हात्रे म्हणाले की, पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून, लवकरच तो त्रास कमी होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व आमदार रवींद्र चव्हाण हे पुलाच्या कामाजवळ पोहोचले. आयुक्त सूर्यवंशी यांनी नारळ फोडून गर्डर टाकण्याचे काम सुरू झाल्याचे जाहीर केले. लवकर हे काम मार्गी लागणार असून, मेअखेरीस पूल खुला होण्याचे संकेत देत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे  कौतुक केले. मात्र, स्थानिक आमदार  चव्हाण यांनी नारळ फोडण्यास नकार दिला.  चव्हाण यांनी रेंगाळलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जबाबदार धरले. २० महिने उलटून गेले असून, आता गर्डर  येत आहेत. दिरंगाई का झाली, हे प्रशासन सांगत नाही. महापालिका हद्दीतील अनेक प्रकल्प प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रखडले आहेत, असे चव्हाण म्हणाले.

मेअखेरपर्यंत कोपर पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

पुलाच्या कामाचे गर्डर हे औरंगाबाद येथून आले असून, जागेअभावी २१ पैकी ७ गर्डर आणण्यात आले. याचे काम पूर्ण होताच अन्य दोन टप्प्यात गर्डर येतील. मधल्या मोठ्या भागात प्लास्टर, डांबरीकरण केले जाईल, त्यानंतर एप्रिलअखेर अथवा मे मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे महापालिका प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी स्पष्ट केले. त्यावेळी महापालिका शहर अभियंता सपना कोळी, माजी नगरसेवक विष्णू पेडणेकर, विश्वनाथ राणे आदी उपस्थित होते. ब्रिजच्या उभारणीकरिता रेल्वे ट्रॅकपासून राजाजी पथपर्यंत तीन टप्प्यांत तीन गर्डर चढविण्यात येणार आहेत. पहिल्या फेजमध्ये १५ मीटरचे सात गर्डर टाकले जातील आणि पुढच्या फेजमध्ये १२ मीटरचे आणखी सात गर्डर टाकले जातील आणि पुन्हा १८ मीटरचे सात गर्डर टाकले जाणार आहेत. या कामामुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून रामनगर ते राजाजी पथ मार्गे डोंबिवली पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना रामनगर रिक्षा स्टॅण्डपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला होता. तसेच आयरे गाव, आयरेरोड, डोंबिवली पूर्व परिसरातही राजाजी पथ मार्गे रेल्वे स्टेशन, रामनगरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना राजाजी पथ गल्ली क्र.१ च्या कडेला गर्डरचे काम होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाrailwayरेल्वे