डोंबिवली सोनारपाडा परिसरात भंगाराच्या गोडावूनला आग; 7 ते 8 गोडावून आगीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:50 IST2020-12-09T15:49:59+5:302020-12-09T15:50:08+5:30
अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनांस्थळी दाखल

डोंबिवली सोनारपाडा परिसरात भंगाराच्या गोडावूनला आग; 7 ते 8 गोडावून आगीच्या विळख्यात
कल्याण: डोंबिवलीच्या कल्याण -शिळ रोडवर असणाऱ्या सोनारपाडा परिसरातील शंकरा नगर दशरथ म्हात्रे कंपाउंड येथील एका भंगार गोडाऊनमध्ये आग लागली काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत कंपाउंड मधील सुमारे 15 गोडावून आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या गोडावून मध्ये जुने फ्रीज ,वॉशिंग मशिनसह इतर भंगार साहित्य असल्याने स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे.
या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी आग लागल्यानंतर याठिकाणी स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहेत. या आगीची तीव्रता एवढी मोठी आहे की डोंबिवलीच्या कोणत्याही परिसरातून धुराचे लोट दिसत आहेत. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत .आगीची तीव्रता पाहता स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.