शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शाळा झाल्या सुरू... रेल्वे सेवाही सुरळीत, जनजीवन मात्र विस्कळीत

By अनिकेत घमंडी | Updated: July 24, 2023 12:46 IST

दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता, आभाळ काळ्या ढगांनी व्यापलेले होते, जोरदार सरींवर सरी पडत होत्या.

डोंबिवली: गेल्या आठवडाभर पावसाने ठाणे जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली होती, सोमवारीही पहाटेपासूनच पावसाने जोर धरला होता, सकाळी।पहिल्या सत्रात पावसाची संततधार सुरू होती. रेल्वे सेवा सुरळीत सुरू असली तरी कल्याण।डोंबिवली शहरातील नागरिकांची सकाळपासून लगबग सुरू होती. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू असली तरी जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या आठवड्यात मंगळवारनंतर जिल्हाधिकायांच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या।होत्या, सोमवारपासून शाळा।सुरू झाल्याने सकाळपासून विद्यार्थ्यांची ठिकठिकाणी धावपळ सुरू होती. सोमवार असल्याने डोंबिवली पूर्वेकडील आठवड्याच्या सुट्टीमुळे दुकाने बंद होती, भाजी बाजारात तुलनेने शुकशुकाट पसरला होता.

दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता, आभाळ काळ्या ढगांनी व्यापलेले होते, जोरदार सरींवर सरी पडत होत्या. दुपारच्या सत्रात शाळा सुटताना आणि भरताना विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. पालकांनी रेनकोट, छत्र्या देऊनही विद्यार्थी भिजले. रिक्षा वाहतुकीवर मात्र कोणताही परिणाम।झाला नव्हता, पाऊस असल्याने रिक्षेला पसंती सर्वाधिक होती, त्यामुळे शहरातील बहुतांशी रिक्षा स्टँडवर प्रवासी रिक्षेची वाट बघत होते. परिवहनच्या निवासी, लोढा, खोनी, नवनीतनगर भागासह अन्यत्र जाणाऱ्या बस सेवेला भरपूर मागणी होती, त्या बसेस प्रवाशांनी तुडूंब भरलेल्या होत्या. शहरातील सखल भागात पाणी साचलेले होते. 

एमआयडीसी भागात भरपूर खड्डे झाल्याने तेथील वाहतूक मंदावली होती, अनेक वाहन चालकांनी घरडा सर्कल येथे गेल्यावर बंदिश हॉटेलमार्गे नाट्यगृहाच्या रस्त्यावरून नंदी पॅलेस समोरील रस्त्यावरून पुढे मार्ग काढला. तर काहींनी टाटा लेन मार्गे कल्याण ला जाणे पसंत केले.कल्याणवरून येणाऱ्या वाहनांनी ९० फिट रस्त्यामार्गे ठाकुर्लीत येऊन डोंबिवलीत जाणे पसंत।केले, त्यामुळे ठाकुर्लीच्या हनुमान मंदिर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. डोंबिवली शहराच्या पश्चिमेला देखील रेल्वे स्थानक परिसर वगळता अन्यत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. घनश्याम गुप्ते रस्त्यावरील व्यापारी ग्राहक नसल्याने अपेक्षित व्यवहार न झाल्याने चिंताग्रस्त होते. सर्वत्र महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित असली तरी खाडी किनार्यावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणेdombivaliडोंबिवली