शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांच्या रिक्षाला अपघा, डोंबिवलीतील धक्कादायक घटना; सुदैवाने रिक्षातील विद्यार्थी सुखरूप

By प्रशांत माने | Updated: December 20, 2023 19:42 IST

रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली: शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास पुर्वेकडील मानपाडा चार रस्ता येथे घडली. रिक्षात तीन विदयार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रमेश बागुल असे रिक्षाचालकाचे नाव आहे. मानपाडा चार रस्ता येथून विदयार्थी घेऊन जात असताना त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्ता सोडून बाजुकडील एका दुकानात शिरता शिरता राहिली. रिक्षा थेट फुटपाथवर चढली आणि त्याठिकाणी पार्क असलेल्या मोटारसायकलला धडकली आणि थांबली. धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागील सीटवर दोन विदयार्थी बसले होते. मागे सीटवर जागा असतानाही एका विदयार्थ्याला चालकाच्या बाजूला बसविण्यात आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रसाद आपटे यांनी दिली. महत्वाचे म्हणजे रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याचेही समोर आले आहे. अपघात घडला तेव्हा रिक्षात तीन विदयार्थी होते परंतू एरव्ही दहा ते बारा विदयार्थी या रिक्षात असतात अशीही माहिती मिळत आहे.

आठ हजाराचा ठोठावला दंडसंबंधित रिक्षाचालकाकडे परवाना नसल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालविल्याने वाहतूक शाखेच्या वतीने त्याला आठ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान बेजबाबदार रिक्षाचालकाविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही त्यामुळे त्याच्याविरोधात  रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही.

आरटीओ विभागाला जाग कधी येणार?कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात त्यात शाळकरी मुले देखील अपवाद नाही. बेकायदा वाहतूकीकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी घडलेल्या घटनेनंतर तरी आरटीओ विभागाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी