कल्याणमध्ये शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
By मुरलीधर भवार | Updated: August 29, 2024 14:28 IST2024-08-29T14:28:12+5:302024-08-29T14:28:51+5:30
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिग्रेडने आंदोलन केले. आपटे हे कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील स्वामी नारायण इमारतीत राहतात.

कल्याणमध्ये शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
कल्याण- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिग्रेडने आंदोलन केले. आपटे हे कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील स्वामी नारायण इमारतीत राहतात. आपटे हे घटना घडली त्या दिवशी घटनास्थळी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
आपटे यांच्या कल्याणमधील घराला त्या दिवसापासून कुलूप आहे. या कूलूप बंद घरावर आंदोलकांनी जयदीप आपटे शिवद्रोही असा उल्लेख असलेला आपटे यांचा फोटो चिटकावण्यात आला आहे. तसेच दारासमोर अंडी फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. हा प्रकार कळताच घटनास्थळी बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. त्यापूर्वी आंदोलक आंदोलन करुन त्याठिकाणीहून निघून गेले होते.