लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिलांची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 15:14 IST2021-01-03T15:13:51+5:302021-01-03T15:14:07+5:30

Kalyan : लिफ्टमध्ये तीन महिला अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्याठिकाणी पोहोचले.

Safe release of three women trapped in an elevator | लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिलांची सुखरूप सुटका

लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिलांची सुखरूप सुटका

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल येथील व्होल्गा इमारतीच्या लिफ्टमध्ये तीन महिला अडकल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन या लिफ्टमध्ये अडकलेल्या तिन्ही महिलांची सुखरुप सुटका केली आहे.

व्होल्गा सोसायटीच्या लिफ्टमध्ये तीन महिला अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्याठिकाणी पोहोचले. इमारत सात मजली आहे. लिफ्ट चौथ्या आणि पाचव्या मजल्याच्या मध्ये अडकली होती. 

लिफ्टमध्ये विनिता हुबळीकर, शीतल हुबळीकर आणि सुषमा म्हारुळकर या महिला अडकल्या होत्या. त्यापैकी शीतल या 68 वर्षे वयाच्या होत्या. त्या हार्ट पेशंट असल्याने अग्निशमन दलाने इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये लिफ्टचे ब्रेक्स मॅन्युअली लूज करुन लिफ्ट चौथ्या मजल्यावर आणली. याबाबतची माहिती अग्निशमन दलाचे जवान विनायक लोखंडे यांनी दिली आहे.

Web Title: Safe release of three women trapped in an elevator

टॅग्स :kalyanकल्याण