शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांना शिवसेना जबाबदार, राजू पाटील यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:38 IST

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले.

कल्याण - रस्त्यावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ठाण्यात बोलले, की अधिकाऱ्यांवर कारवाई करू, ठेकेदारांना काढून टाकू. माझा स्पष्ट आरोप आहे, की येथील सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत. यामुळेच रस्त्यांची खस्ता हालत झाली आहे. यांनी कल्याण-डोंबिवलीची वाट लावली आहे, असा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच या परिस्थितीसाठी शिवसेनेलाच जबाबदार धरले आहे. (The rulers are eating the share of the tiger; Shiv Sena responsible for pits in Kalyan-Dombivali says MNS leader Raju Patil)

आमदार पाटील यांनी आज कल्याण मलंग रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील हेही उपस्थित होते. रस्त्याच्या पाहणी पश्चात आमदार पाटील हे संतप्त झाले. ते म्हणाले, कल्याण मलंग रस्त्यावर 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. 31 मे 2019 रोजी हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला वाढीव पैसे दिले जात आहेत. तसेच कंत्रटदाराला मुदतवाढ दिली, तीही संपुष्टात आली. बहुतेक त्याला मुदतवाढ देणार, कारण खाल्ला मिठाला जागणार आहेत. 

या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल कंत्राट कंपनीला आधीच दिले गेले आहे. हे काम ज्या कंत्राट कंपनीला दिले होते. ती रेलकॉन कंपनी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे. ब्लकलिस्टेड ठेकेदारांना कामे दिली तर हीच परिस्थिती होणार. कल्याण मलंग रस्त्याचीच नव्हे संपूर्ण कल्याण डोंबिवलीतील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. पालकमंत्र्यांनी वेळ काढून रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे. 

आमचे आयुक्तसाहेब हे अद्याप कलेक्टर मोडमधून आयुक्त मोडमध्ये आलेले नाही. खुर्च्या उबवायला बसलेत. कुठलीही कामे करीत नाहीत. कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविले होते. प्रशासन कोणाचीच दखल घेत नाही. यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज पाहणीला येणार असे सांगितल्यावर काही मुख्य अधिकारी आजारी पडल्याचे सांगत आहेत. आत्ता मला कळाले, की ते का आले नाही. इंजिनिअर खात्यात बदली केली जाते. कोणाला कोणाचा पायपोस नसतो. एकमेकांवर ढकलपट्टीची कामे चालू असतात. अत्यंत वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. कल्याण-डोंबिवलीची सत्ताधाऱ्यांनी वाट लावून ठेवली आहे, असेही पाटील  म्हणाले.

कल्याण डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले याविषयी पाटील यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, दिसतो का, असा प्रतिसवाल उपस्थित केला. खड्ड्यांचे सोडा पालिकेतील अधिकारी बिले काढण्यासाठी 2 टक्के घेतात. सगळीकडे अडवणूक, फसवणूक सुरु आहे. एक तर लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासक आहे. कशाला कशाचा पायपोस नाही. खड्डे बुजविण्यासाठी आठ वर्षात 114 कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी हीच परिस्थिती असते. निवडणूका आल्यावर आत्ता स्कीम घेऊन येतील. खड्डे भरा, नाही तर यांना आम्हाला खड्ड्यात भरावे लागेल, असा इशाराही यावेळी आमदार पाटील यांनी दिला आहे. आम्ही काय करू शकतो, मग केसेस करणार आमच्यावर, करू देत. सहनशीलतेचा अंत झाला आहे. नुसते खड्डेच खड्डे आहेत, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेPotholeखड्डे