यम है हम... कल्याण-शीळ रोडवर अवतरले यमराज; रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांची गांधीगिरी
By मुरलीधर भवार | Updated: January 5, 2023 15:22 IST2023-01-05T15:20:30+5:302023-01-05T15:22:56+5:30
नियम मोडणाऱ्या वाहनचालकाना यमराजाने दिले गुलाबाचे फुल

यम है हम... कल्याण-शीळ रोडवर अवतरले यमराज; रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांची गांधीगिरी
कल्याण- रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांनी कल्याण शीळ रोड वर वाहनचालकांमध्ये अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. वाहतूक पोलिसांतर्फे कल्याण शीळ रोड वर प्रतीकात्मक यमराजाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देत वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.
हातात प्रतीकात्मक शस्त्र घेत कल्याण शीळरोड वर फिरणारा यमराज पाहून काही जण थबकले तर काही जणांनी गाडीला ब्रेकच लावला .त्रिपल सीट, विना हेल्मेट ,विना सीट बेल्ट न लागता वाहन चालवनाऱ्या वाहनचालकांना यमराज ने पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं. कल्याणच्या काेळसेवाडी वाहूतूक शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी ही संकल्पना राबवून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी ही जनजागृती केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"