शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरजवळच्या दगड खाणीला १९० कोटींचा दंड; मुंबई उच्च न्यायालयाचा खाण मालकाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:28 IST

बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर :  बदलापूरजवळील चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगड खाणीला १९० कोटींचा दंड ठोठावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने न्यायालयाने दगड खाणीवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

बदलापूरजवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याचीवाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. सातत्याने होणारे वायू, ध्वनिप्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक झाल्या आहेत. तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झाले आहेत. ही दगड खाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही ती बंद होत नव्हती. 

रॉयल्टी भरली नाहीपरवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत एक लाख ३० हजार ब्रास दगड खाणीचे उत्खनन केल्याने आणि त्याची रॉयल्टी न भरल्याने न्यायालयाने खाण मालकाला १९० कोटी ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीने त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता ही दगड खाण बंद होणार असल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले.

कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाहीदुसरीकडे, दगड खाण मालकांनी आपली बाजू मांडली असून, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आपली खाण नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जो दंड लावला आहे त्यासंदर्भात आपण उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्याचेही स्पष्ट केले आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर