शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाचे छत कोसळले, कार्यालय फोडल्याचा आरोप;  गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 00:49 IST

छत कोसळले की फोडले याबाबत संभ्रम असून कार्यालय फोडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे.

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाचे छत रविवारी कोसळल्याचे उघडकीस आले. छत कोसळले की फोडले याबाबत संभ्रम असून कार्यालय फोडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. हे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंवर पोलिसांनी तात्काळ  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे कार्यालय 52 वर्ष जुने आहे. इमारतदेखील जूनी आहे.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे, नवेंदू पाठारे, अशोक कापडणे, वर्षा शिखरे, संजय पाटील, एकनाथ म्हात्रे यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. या घटनेनंतर कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर असून तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केल्याचे यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी संतोष केणे यांनी सांगितले.  

कार्यालयाचे छत कोसळले की कार्यालय फोडले. यामागे नेमका काय हेतू असावा? यामागे कोणाचा हात आहे? कार्यालय तोडून कोणाला फायदा होणार आहे? याची सखोल चौकशी पोलिसांनी केल्यास वास्तविकता समोर येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस