शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भारतीय सैनिकांची विजयगाथा सांगणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे रिटायर्ड मेजर आर्किटेक्ट विनय देगावकर यांच्या हस्ते उद्घाटन

By अनिकेत घमंडी | Updated: September 23, 2023 16:30 IST

युद्धात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र विजेत्या भारतीय सैन्यातील २१ जवानांची माहिती पण येथे वाचायला मिळणार आहे.

डोंबिवली: यंदा भारतीय सैन्याने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे तसेच २०२४  हे कारगिल विजयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या दोन्ही घटनांचे औचित्य साधून डोंबिवलीच्या टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळतर्फे नमस्ते शौर्य फाउंडेशनचे भारतीय सैनिकांची विजय गाथा सांगणारे एक चित्र प्रदर्शन शनिवार, २३ सप्टेंबर ते बुधवार,२७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवात म्हणजेच सुयोग मंगल कार्यालय नंबर २ येथे विनामूल्य आयोजित केले आहे. या  प्रदर्शनात भारतीय सेनेची विजयगाथा तसेच पाकिस्तान आणि चीन सोबत झालेल्या युद्धातील काही फोटो तसेच भारतीय युद्ध नौका, वायुसेनेची हेलिकॉप्टर काही विमानांचे मॉडेल्स, बोफोर्स तोफा आणि बरच काही पाहायला मिळणार आहे.

युद्धात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र विजेत्या भारतीय सैन्यातील २१ जवानांची माहिती पण येथे वाचायला मिळणार आहे. डोंबिवली ते बदलापूर परिसरात रहाणारे काहि सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी निवृत्त मेजर आर्किटेक्ट विनय देगावकर यांनी मंडळातर्फे या विषयावर प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भारतीय सैन्याची यशोगाथा सामान्य नागरिक, तरुणाई आणि लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे विनय देगावकर म्हणाले. उद्घाटनप्रसंगी शौर्य फाऊंडेशनचे कुणाल आणि विलास सुतावणे, मंडळाचे अध्यक्ष सुशिल भावे मंडळाचे उत्सव समिती प्रमुख नंदन दातार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केदार पाध्ये यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर उत्सव समिती प्रमुख नंदन दातार यांनी डोंबिवलीकरांना आपल्या मुलांसह या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले.