शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के नागरिकांना श्वसन व त्वचाविकार, डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतीमधील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 09:04 IST

Dombivli News : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील ६० टक्के लोकांना श्वसनाचे किंवा त्वचेचे विकार जडले आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील ६० टक्के लोकांना श्वसनाचे किंवा त्वचेचे विकार जडले आहेत. वारंवार सर्दी होणे, घशाला सूज येणे किंवा त्वचेवर रॅशेस येणे अशा तक्रारींकरिता ही मंडळी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांबरोबरच वैद्यकीय व्यावसायिकांनीही रासायनिक कारखाने हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.डोंबिवलीतील धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. डोंबिवली निवासी भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा त्रास होत आहे. प्रदूषणामुळे वरचेवर आजारी पडलेले रुग्ण डॉक्टरांकडे उपचारांंसाठी हेलपाटे मारत असतात. प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के आहे, असे डॉक्टर सांगतात. डोंबिवली औद्योगिक निवासी भागात गेल्या ३० वर्षांपासून कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. घनश्याम शिराली प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांनी सांगितले की, दमट हवामान असल्यामुळे प्रदूषणातील प्रदूषित घटकांचा मानवी शरीरावर थेट परिणाम होतो. प्रदूषणामुळे ॲलर्जी रिॲक्शन येते. नाकातून पाणी येणे, नाक चोंदणे, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे असा त्रास जाणवत असल्याची तक्रार अनेक पेशंट वरचेवर करतात. श्वासनलिकेस सूज आल्यामुळे अनेकांना कोरडा खोकला होतो. तो जाता जात नाही. सारखी सर्दी होऊन काहींना सायनसचा आजार होतो. सर्दी वारंवार झाल्यास कानाला सूज येऊन ऐकू कमी येते. प्रसंगी कान फुटतो. कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया करावी लागते. अनेकांना दम्याचा त्रास होतो. दररोज तपासणीकरिता येणाऱ्या दहा रुग्णांपैकी सहा रुग्ण प्रदूषणामुळे होणाऱ्या ॲलर्जिक रिॲक्शनचे असतात. त्यातून पुढे काही गंभीर आजार उद्भवतात.  

रसायनमिश्रित पाणी रस्त्यावरत्वचारोग तज्ज्ञांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, एमआयडीसी परिसरात बिगर रासायनिक कारखान्यांतही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायाचे त्वचारोग झाले आहेत. अनेकदा रासायनिक कारखाने रसायनमिश्रित पाणी रस्त्यात सोडून मोकळे होतात. अनेक कर्मचारी त्या सांडपाण्यातून प्रवास करतात व त्यांना रॅशेस येतात. काहींच्या हातालाही हवेतील रसायनांमुळे त्रास होतो.

फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यताn निवासी भागात राहणारे शल्यचिकित्सक डॉ. आशिष धडस म्हणाले की, डोंबिवली भागात राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषणामुळे आजारी पडण्याचा त्रास होतो. n त्यांच्या कुटुंबातील नातेवाइकांनाही त्रास होतो. प्रदूषणामुळे फुप्फुसांचे विकार होतात. श्वास घेण्यास केवळ वयोवृद्ध आणि मध्यमवयीन नागरिकांनाच त्रास होत नाही तर लहान मुलांनाही त्रास होतो. n लहान मुलांचा श्वास घेण्याचा रेट जास्त असतो. प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने काही महिन्यांनी एखाद्याला फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.

टॅग्स :pollutionप्रदूषणdombivaliडोंबिवलीHealthआरोग्य