शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे, राज ठाकरेंशी झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 01:46 IST

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने जाहीर केलेल्या नियुक्त्यांवरून उद्भवलेल्या वादात पूर्वेतील ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे उपशहराध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे सादर केले होते.

कल्याण - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने जाहीर केलेल्या नियुक्त्यांवरून उद्भवलेल्या वादात पूर्वेतील ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे उपशहराध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे सादर केले होते. पण, आमदार प्रमोद (राजू) पाटील आणि जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी केलेली मध्यस्थी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी मानाची पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यात तब्बल ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देणाऱ्यांत उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्षांसह गट अध्यक्षांचा समावेश होता. मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि त्यांची नुकतीच कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य एकाच्या झालेल्या नियुक्तीवरूनही नाराजी उफाळून आली होती. यातूनच पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, मनसेत राजीनाम्यांच्या भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली होती. पक्षस्तरावर हा विषय गंभीरपणे घेण्यात येऊन यावर लगेचच मार्ग काढण्यात आला. गैरसमज झाले दूरउपशहराध्यक्ष संतोष राठोड यांच्याकडे सादर केलेले राजीनामे गेल्या सोमवारी मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्याकडे दिले जाणार होते. पण आमदार पाटील यांनी चर्चेसाठी बोलावल्याने राजीनामा सादर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. त्यात शुक्रवारी नाराजी प्रकरणाची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती राजीनामे मागे घेण्यात आले. ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आमचे गैरसमज दूर झाले असून आम्ही आमचे राजीनामे मागे घेत असल्याची माहिती उपशहराध्यक्ष राठोड यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण