प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

By मुरलीधर भवार | Updated: December 8, 2022 17:15 IST2022-12-08T17:13:58+5:302022-12-08T17:15:04+5:30

माकडांना दिलं वनविभागाच्या ताब्यात

Rescue of two monkeys from Madari's clutches due to the promptness of animal lovers | प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मदाऱ्याच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

कल्याण: प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे माकडाच्या छोट्या जखमी पिलासह दोन माकडांची मदारीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. प्राणीमित्रांनी या माकडांना वनविभागाच्या ताब्यात दिले असून वैद्यकीय तपासणी आणि उपचार करून त्यांना सोडून देण्यात येणार आहे. 

कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील शाळेसमोर आज सकाळी ९.३० च्या सुमारास प्राणीप्रेमी डिंपल शहा यांना एक मदारी दोन माकडांसोबत खेळ करत असल्याचे दिसून आले. या माकडांची मदारीकडून सुटका करण्याच्या हेतूने त्यांनी वन्यजीव रक्षक सुहास पवार यांना बोलावले. त्यावर सुहास पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन्ही माकडांपैकी मोठ्या माकडाच्या शरीरावर विविध रंगांचे स्प्रे मारून आणि गळ्यात घुंगरांचा पट्टा अडकवून खेळ करून घेतले जात होते. तर माकडाच्या लहान पिल्लाच्या शेपटीजवळ जखम झाल्याचे पवार यांना आढळुन आले.

या दोन्ही माकडांना दोरीने बांधून मदारीकडून  खेळ सुरू होता. दरम्यान पवार यांनी याबाबत कल्याणचे वन-अधिकारी राजू शिंदे यांना फोनवरून प्राथमिक माहिती देत या दोन्ही माकडांना वनविभागाच्या ताब्यात दिले.

Web Title: Rescue of two monkeys from Madari's clutches due to the promptness of animal lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण