मेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या डॉक्टरकडून दंड वसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 08:01 PM2021-04-15T20:01:42+5:302021-04-15T20:01:53+5:30

साई डेंटल क्लिनिकचे डॉ. उपाध्ये यांनी मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकल्यामुळे त्यांच्याकडून रुपये 10 हजार  रुपयांचा  दंड वसूल केला आहे.

Recovery of fine from doctor who dumps medical waste | मेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या डॉक्टरकडून दंड वसूल 

मेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या डॉक्टरकडून दंड वसूल 

Next

कल्याण :   
      कल्याण  डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत  असताना कल्याण पश्चिम परिसरात एका कचराकुंडीत  हॅन्डग्लोज , मास्क , इंजेक्शन आणि वापरलेल्या पीपीई किट्स आढळून आल्या होत्या. या ठिकाणी कचरा वेचण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या ही  गोष्ट निदर्शनास आली होती. डॉक्टरांच्या औषधाचे प्रिस्क्रिप्शन देखील सापडले होते.

कोरोना काळात अशा प्रकारे जैविक कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याने हा घृणास्पद  प्रकार नेमका  कोणी केला याचा शोध पालिकेने घेतला आहे. या  बाबतीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदार कोकरे आणि प्रभारी आरोग्य निरिक्षक जगन्नाथ वड्डे यांनी समक्ष पाहणी करुन संबंधित साई डेंटल क्लिनिकचे डॉ. उपाध्ये यांनी मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकल्यामुळे त्यांच्याकडून रुपये 10 हजार  रुपयांचा  दंड वसूल केला आहे. त्यामुळे डॉक्टरच असे बेजबाबदारपणे वागत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? असा सवाल निर्माण झाला आहे.

Web Title: Recovery of fine from doctor who dumps medical waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.