शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हा बालेकिल्ला राखणार कोण? येथे खरी लढत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच 

By मुरलीधर भवार | Updated: May 17, 2024 07:55 IST

ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे. 

मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा महायुतीतर्फे कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष येथे लागले आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे वैशाली दरेकर या निवडणूक रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे आणि उद्धव सेनेकरिता प्रतिष्ठेची आहे. 

कल्याण मतदारसंघाची निर्मिती २००९ साली झाली. त्या आधी हा मतदारसंघ ठाणे मतदारसंघाचा भाग होता. जनसंघापासून या मतदारसंघाचा कल हा हिंदुत्ववादी विचारसरणीला काैल देत आला आहे. रामभाऊ म्हाळगी यांच्यापासून मतदारांनी उजव्या विचारसरणीला कौल दिला. येथून २००९ साली शिवसेनेचे आनंद परांजपे निवडून आले. २०१४ व २०१९ साली शिवसेनेचे डाॅ. श्रीकांत शिंदे निवडून आले. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष असला, तरी खरा सामना एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असाच आहे. कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

गाजत असलेले मुद्दे

उद्धवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेली टीका.उद्धवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांनाच टीकेचे लक्ष्य केले गेले. 

कोण गेले कुणाकडे? 

दरेकर यांना उमेदवारी दिल्याने उद्धवसेनेत नाराजी होती. ते पदाधिकारी शिंदेसेनेत गेले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांची नाराजी दूर करण्यात आली. त्यांच्या पत्नी सुलभा या खासदार शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

खासदार शिंदे यांनी ‘आमचं काम बोलतंय’ अशी विकासकामाची होर्डिंग लावली आहेत.उद्धवसेनेकडून कामे केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. केवळ जाहिरातबाजी सुरू  असल्याची टीका.मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री असताना दत्तक घेतलेल्या गावात सोयी-सुविधांचा अभाव.उद्धवसेनेकडून शिंदे यांच्यासमाेर तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याची टीका.प्रदूषणमुक्त जीवन आणि रेल्वेचा सुरक्षित प्रवास नसल्याची उद्धवसेनेकडून टीका.

शिंदेसेनेकडून राजकीय धक्कातंत्राचा अवलंब 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या आधी आणि आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक एका टिपेला पोहोचली असताना उद्धवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवक यांना शिंदेसेनेत घेऊन उद्धव सेनेची हवा गूल केली आहे. शिंदेसेनेकडून राजकीय धक्कातंत्राचा अवलंब केला जात आहे.

२०१९ मध्ये काय घडले ?

डॉ. श्रीकांत शिंदे     शिवसेना (विजयी)     ५,५९०००बाबाजी पाटील     राष्ट्रवादी     २,१५,०००

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष    विजयी उमेदवार          पक्ष    टक्के२००९  आनंद परांजपे           शिवसेना               -२०१४    डाॅ. श्रीकांत शिंदे         शिवसेना               -२०१९    डाॅ. श्रीकांत शिंदे         शिवसेना         

टॅग्स :kalyan-pcकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Shrikant Shindeश्रीकांत शिंदेvaishali darekarवैशाली दरेकरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे