प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

By प्रशांत माने | Updated: January 21, 2024 14:54 IST2024-01-21T14:54:34+5:302024-01-21T14:54:52+5:30

भगवे झेंडे हातात घेऊन शेकडो तरूणांनी सहभाग घेतला होता.

Rally of Yuva Sena on the occasion of installation ceremony; The slogans of Jai Sri Rama reverberated | प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

डोंबिवली: अयोध्येत सोमवारी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी पार पडणार आहे. तत्पुर्वी या सोहळयानिमित्त रविवारी शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले गेले होते. युवा सेना सचिव तथा केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळयाचे बॅनर्स, भगवे झेंडे हातात घेऊन शेकडो तरूणांनी सहभाग घेतला होता.

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळयानिमित्त कल्याण डोंबिवली शहरात शिवसेना, भाजप आणि हिंदु संघटनांच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने आठवडाभरापासून दोन्ही शहरांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना युवा सेनेच्या वतीने भव्य अशा रॅली चे आयोजन केले गेले होते. सकाळी ११ वाजता म्हात्रे यांच्या पश्चिमेकडील मोठा गाव ठाकुर्ली येथील कार्यालयातून या रॅलीला प्रारंभ झाला. सम्राट चौक, व्दारका हॉटेल, विष्णुनगर,गोपी टॉकीज, कोल्हापूरे चौक, डोंबिवली रेल्वे स्टेशन, ठाकुर्ली उड्डाणपूल, पुर्वेकडील मंजुनाथ शाळा, घरडा सर्कल, टिळक चौक, सर्वेश हॉल, फडके रोड अशी रॅली मार्गस्थ होत रॅलीचा समारोप डोंबिवली शिवसेना शहर शाखा येथे झाला.

Web Title: Rally of Yuva Sena on the occasion of installation ceremony; The slogans of Jai Sri Rama reverberated