राज्यराणी, पंचवटी, जनशताब्दी, पटना, तपोवन शालिमार गाड्यांना कसारा स्थानकात थांबा सुरू
By अनिकेत घमंडी | Updated: August 23, 2023 12:52 IST2023-08-23T12:52:20+5:302023-08-23T12:52:29+5:30
प्रवासी संघटनेकडून लोको पायलट, गार्ड, स्थानक प्रबंधकांचा सत्कार

राज्यराणी, पंचवटी, जनशताब्दी, पटना, तपोवन शालिमार गाड्यांना कसारा स्थानकात थांबा सुरू
डोंबिवली: कसारा स्थानकात अप मार्गावरील मुंबई दिशेकडे जाणार्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने त्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेत राज्यराणी, पंचवटी, जनशताब्दी, पटना, तपोवन आणि शालिमार या गाड्यांना बुधवारपासून कसार्यात थांबा दिला.
त्याबद्दल असोसिएशनच्या वतीने बुधवारी सकाळी पंचवटी एक्सप्रेसचे मोटरमेन, कसारा स्थानक प्रबंधक यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अध्यक्ष शैलेश राऊत, कार्याध्यक्ष रमाकांत पालवे, उपाध्यक्ष दिलीप पंडीत, स्थानक प्रबंधक किरण जाधव, आरपीएफ उपनिरिक्षक समाधान वाहुळकर ,महिला आरपीएफ एफ.एम.तहसीलदार, जीआरपी राजे भोसले, यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते.