शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:46 IST

विद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी

ठळक मुद्देविद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी

कल्याण : ठाण्याहून घरी परतत असलेल्या महिला कर्मचारी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात चोरटय़ाने मोबाईल हिसकावला. या घटनेत विद्या यांचा अपघाती मृत्यू झाला. विद्या यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मनसेच्या वतीने स्वत: आमदार ही विद्याच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचे आमदारांनी सांगितले."डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान परिसरात विद्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. त्यांचे पती, तीन मुली सासू सासरे असा त्यांचा परिवार होता. विद्या या साकीनाका परिसरात एका खाजगी कंपनीत कामाला होत्या. शनिवारी त्यांनी ठाणे येथून डोंबिवलीला घरी येण्यास गाडी पकडली. कळवा रेल्वे स्थानकात त्यांचा मोबाईल चोरट्याने हिसकावला. त्याचा पाठलाग करताना विद्या यांचा गाडी खाली सापडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचा त्या आधार होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी त्या नोकरीत करुन संसाराला हातभार लावत होत्या. त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. रेल्वेने त्यांना आर्थिक मदत द्यावी," अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर विद्या यांचा मोबाईल हिसकावून त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या चोरटय़ाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र हा आरोपी या पूर्वीही याच प्रकारच्या गुन्ह्यात पकडला गेला होता. तो सूटन आल्यावर लॉकडाऊनच्या काळात रेल्वे फटालावर पोहचला कसा हा संशोधनाचा विषय आहे याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलrailwayरेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली