शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत जावे, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची सुप्त इच्छा  

By अनिकेत घमंडी | Updated: January 3, 2024 14:19 IST

चव्हाण हे कोकणातून निवडणूक लढवणार अशा चर्चा गेले काही दिवस माध्यमात रंगत असतात. चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली विधानसभेवर आतापर्यंत ३ वेळा स्वतःच्या एकहाती विजयाची मोहोर उमटवलेली आहे. 

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचा दुवा असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी याकरिता भाजपमधील काही मंडळी व शिवसेनेतील काही मंडळी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. चव्हाण हे राज्यातील राजकारण सोडून दिल्लीत गेल्याखेरीज भाजपच्या स्थानिक नेत्यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळत नाही, तर कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात शिवसेनेला मोकळीक हवी असेल तर चव्हाण यांच्यासारखा प्रभावशाली नेता दिल्लीत जाणे हेच हितावह वाटत आहे. मात्र, हा निर्णय सर्वस्वी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे. तसेच चव्हाण यांची याबाबतची प्रतिक्रिया पुढे आलेली नाही.चव्हाण हे कोकणातून निवडणूक लढवणार अशा चर्चा गेले काही दिवस माध्यमात रंगत असतात. चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली विधानसभेवर आतापर्यंत ३ वेळा स्वतःच्या एकहाती विजयाची मोहोर उमटवलेली आहे. 

 भाजप-शिवसेनेतील   दबावतंत्र आहे का? - २०१४ च्या युती सरकारच्या काळात त्यांच्या प्रवास करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले होते. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांसोबत पहिल्या दिवसांपासून ते शिंदे यांच्या शपथविधीपर्यंत चव्हाण हेच होते. आताही शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्री, सिंधुदुर्ग, पालघरचे पालकमंत्रिपद दिले आहे. - सातत्याने कोकणचा दौरा करून त्यांनी कोकणात भाजपचे जाळे घट्ट केले. परंतु शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आपले बंधू यांच्याकरिता दावा केला आहे. त्यामुळे चव्हाण यांची उमेदवारी हे भाजप-शिवसेनेतील दबावतंत्र आहे की, खरोखरच चव्हाण यांच्या विजयी होण्याच्या क्षमतेमुळे त्यांना तेथून उभे करण्याचा निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.  

मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षात वरिष्ठ नेते निर्णय घेतात, ते जी जबाबदारी देतील ती मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तीच माझी भूमिका असते व राहील.-रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री 

टॅग्स :BJPभाजपाdombivaliडोंबिवली