मुरलीधर भवार, कल्याण: माझी वसुंधरा अभियान ५.० मोहिमेतील सन २०२४-२५ या वर्षात अमृत गटात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस १ कोटी ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
राज्य सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाकडून पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान ५.०' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविले जाते. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी या अभियानात राज्यातील ४२२ नागरी स्वराज्य संस्था, २७ हजार ८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८ हजार ३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अमृत गटात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस दीड कोटीचे बक्षिस राज्य सरकारने जाहीर केले आहे.
'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन आणि फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्हीही मूल्यमापनातील एकुण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियानमधील लोकसंख्यानिहाय १४ गटातील विजेत्यांची सरकारच्या मान्यतेनुसार निवड करण्यात आली. याबाबतच्या निकषांमध्ये वृक्षारोपण, सौरऊर्जा वापर, तलावांचे सुशोभिकरण, वायु गुणवत्ता चाचणी, नागरीकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती इ. या निकषांवर आधारीत गुणांकन करण्यात आले. महापालिकेस जाहिर झालेल्या बक्षीसामुळे महापालिकच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Web Summary : Kalyan-Dombivli Municipal Corporation received ₹1.5 crore under the Majhi Vasundhara Abhiyan 5.0 for its environmental efforts. The award recognizes work in areas like tree planting, solar energy use, and public awareness, boosting the city's reputation for sustainability, based on evaluations by state government.
Web Summary : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका को माझी वसुंधरा अभियान 5.0 के तहत पर्यावरण प्रयासों के लिए ₹1.5 करोड़ मिले। पुरस्कार में वृक्षारोपण, सौर ऊर्जा उपयोग और जन जागरूकता जैसे क्षेत्रों में किए गए कार्यों को मान्यता दी गई है, जिससे शहर की स्थिरता की प्रतिष्ठा बढ़ी है।