शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केबल दुरुस्तीच्या वादातून एनआरसी कंपनीच्या खाजगी बाऊन्सरने केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 15:59 IST

Kalyan-Dombivali Crime :  तुटलेल्या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या अशी मागणी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केली जात होती. कंपनीचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या वाद सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केला.

कल्याण - एमआआरडीएकडून मोहने परिसरात रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम आहे. यावेळी एनआरसी कंपनीला पाणी पंपाला वीज पुरवठा करणारी केबल तुटली.  तुटलेल्या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या अशी मागणी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केली जात होती. कंपनीचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या वाद सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. मात्र गोळीबार करणा-या बाऊन्सरला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बाऊन्सरचे नाव अनिलकुमार सिंग असे आहे.ही घटना सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु असताना एनआरसी कंपनीच्या पंपाला पुरवठा करणारी वीजेची केबल तुटली. ही केबल तुटल्याने एनआरसी कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. केबल दुरुस्तीचा खर्च भरुन द्या अशी मागणी कंपनीचे अधिकारी होती. एमआरडीएचे अधिकारी कंपनीकडून जास्तीचा खर्च सांगितला जात असल्याचे सांगत होते. त्यामुळे हा वाद मिटत नव्हता. हा सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सर त्याठिकाणी पोहचले. त्यापेैकी अनिलकुमार सिंग या बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. गोळी कोणाला लागली नाही. मात्र गोळीबार होताच सगळेच भितीपोटी पांगले. पोलिसांनी अनिलकुमार सिंगला अटक केली आहे.एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली गेली नसताना कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरे व बंगले यांचे पाडकाम सुरु आहे. त्याला कामगारांचा विरोध सुरु आहे. या प्रकरणी २५ कामगारांना पोलिसांनी चार दिवसापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुन्हा आज  केबल दुरुस्तीवर अधिका:यांमध्ये वाद सुरु असताना कंपनीच्या खाजगी बाऊन्सरकडून गोळीबार केला गेल्याने एक प्रकारे दशहत माजविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे कामगार वर्गाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण