शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील

By मुरलीधर भवार | Updated: April 27, 2024 21:17 IST

विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर

मुरलीधर भवार-कल्याण: ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते. ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात असे प्रतिउत्तर भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. 

खासदार पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाटील यांनी जातीला पाहून मतदान करु नका. विकासाला मतदान करा असे आवाहन केले होते. हा व्हीडीआे विरोधकांकडून जाणीवपूर्वक सोशल मिडियावर व्हायरल केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देताना खासदार पाटील यांनी सांगितले, कुठलाही समाज जातीवर जाऊन मतदान करीत नाही. जनता सगळी सुशिक्षित झाली आहे. पण काही लोकांना अशा प्रकारे आधार घ्यावा लागता. ते जनतेची दिशाभूल करीत असतात. माझा मुद्दा असा आहे की, जनतेने विकासाच्या मुद्यावर मतदान करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरु आहे. आणी म्हणून कुठल्याही समाजाला जातीवर मतदान करण्याचे आवाहन मी तरी कधी करीत नाही. कोणी करु ही नये. आपण विकासाच्या मुद्यावरच निवडणूका लढविल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते. त्याला लोकांना कुठला ना कुठला आधार हवा असतो. म्हणून ते जनतेची दिशाभूल करीत असतात असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४