शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला मंत्रिपद देण्यास आमचा विरोध; त्यांचा काही संबंधच येत नाही- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 20:56 IST

आठवले हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक केले.

कल्याण: मंत्रिमंडळात एखादे मंत्रिपद आम्हाला मिळेल अशी आशा आहे. परंतु मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच येत नाही. ते काही निवडणुकीत आमच्या बरोबर नव्हते. त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार होत असेल तर आमचा विरोध असेल असे, मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले.

अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर सेना भाजपाने एकत्र आले पाहिजे हे मी आधीपासूनच सांगत होतो. परंतु उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकून चुकीचा निर्णय घेतला आणि तेव्हापासूनच शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. याची परिणीती आमदारांच्या बंडखोरीच्या माध्यमातून समोर आली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रविवारी आठवले हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक केले.

अनेक वर्षे शिवसेनेत वाढलेले, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केलेले, आनंद दिघे यांचा आशिर्वाद असलेले एकनाथ शिंदे हे नेते असून त्यांनी केलेले बंड हे महाबंड आहे. दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार आपल्या बाजुने वळविण्यात शिंदे यांना यश आले आहे. उद्धव ठाकरे यांना या आमदारांना सांभाळता आले नाही आणि ते आमदार भाजपचे आहेत अशा पध्दतीचा आरोप जे संजय राऊत करत आहेत ते अत्यंत चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला कंटाळून आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी संबंधित आमदार वेगळे होऊन त्यांनी शिवसेनेत आपला अधिकृत गट तयार केला आहे.

सध्या अधिवेशनापूरते  मंत्रीमंडळ हे कमी मंत्र्यांचे होणार आहे. मात्र जेव्हा मंत्रीमंडळाचा विस्तार होईल तेव्हा एखादे मंत्रीपद आरपीआयला नककीच मिळेल. एखादे एमएलसी, महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे यासाठीही आमचे प्रयत्न आहेत असे आठवले म्हणाले. कुठल्या तरी एखादया कामासाठी मुख्यमंत्री बोलत असतील आणि त्याचा कोणी व्हीडीओ काढला तर त्यात गैर काही नाही. एखादया अधिका-याला काम करणे असे सांगणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकारच आहे याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेRamdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार