लोकलमधून पडून आणखी एकाचा मृत्यू?
By अनिकेत घमंडी | Updated: May 4, 2024 22:39 IST2024-05-04T22:39:07+5:302024-05-04T22:39:23+5:30
ही घटना दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान घडली असावी असेही सांगण्यात आले.

लोकलमधून पडून आणखी एकाचा मृत्यू?
डोंबिवली: मैनुद्दीन शहा(१७) रा. भिवंडी या मुलाचा कल्याण ठाणे रेल्वे प्रवासात लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडली. नेमका अपघात लोकलमधून पडून झाला की अन्य कारणाने याबाबत पोलीस साशंक आहेत. ही घटना दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान घडली असावी असेही सांगण्यात आले.
मुलाचा मृत्यू झाला असून त्यासंदर्भात त्याच्या कुटुंबियांचा शोध लागला असून डोंबिवली लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यात ठाकुर्ली मुंब्रा मार्गावर लोकलमधून पडून अपघात झालेली ही चौथी घटना असून प्रवाशांनी सतर्कपणे प्रवास करावा असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.