शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी रुग्णालयात, शिवसैनिक धावले मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 22:29 IST

राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

कोल्हापूर - येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी ठाणे येथील डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फ़े आज 1 लक्ष रुपयांची लाख मोलाची मदत सुपूर्द करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपरोक्त सर्वांनी अतिदक्षता विभागात पैलवान श्रीपती खंचनाळे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली. आरोग्य राज्य मंत्री श्री यड्रावकर यांनी यावेळी श्री. खंचनाळे यांच्या उपचारासाठी शासनामार्फतही  आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.  कोल्हापूरमध्ये डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महाराष्ट्रातील पहिले हिंदकेसरी श्री. खंचनाळे यांच्याबाबतची बातमी समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डाॕ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा सूचना  दिल्या होत्या. तसेच उपचारामध्ये विशेष लक्ष देण्यात यावे यासाठी डायमंड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ साई प्रसाद यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संवाद साधला होता. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही आज आवर्जून श्रीपती खंचनाळे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाशी तसेच आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेशी संवाद साधला. यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी श्री खंचनाळे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ साईप्रसाद व डॉ कौस्तुभ यांचे विशेष आभार मानले.  यापुढील काळातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुस्तीपटूना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला संपर्क करावा, आपण कुस्तीपटूसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत अशी ग्वाही यावेळी डॉ शिंदे यांनी दिली. 

तर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तसेच डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्यात येते , यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिवसेना भवन येथील मुख्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. 

यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साई प्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkolhapurकोल्हापूर