श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शारदा शाळेतील मुलांना पाण्याचा कुलर!

By सदानंद नाईक | Updated: February 4, 2023 16:27 IST2023-02-04T16:27:21+5:302023-02-04T16:27:57+5:30

उल्हासनगरातील झोपडपट्टी भागात शारदा विद्यालय नावाची शाळा असून शाळेत शेकडो गरीब व गरजू मुले शिक्षण घेत आहे.

On the occasion of Shrikant Shinde's birthday, a water cooler was given to the children of Sarada School, Ulhasnagar | श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शारदा शाळेतील मुलांना पाण्याचा कुलर!

श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शारदा शाळेतील मुलांना पाण्याचा कुलर!

उल्हासनगर : शहर शिवसेना शिंदे गटाच्यावतीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. युवानेते बाळा श्रीखंडे यांनी शारदा विद्यालयाच्या मुलांसाठी थंड पाण्याचा कुलर दिला आहे.

उल्हासनगरातील झोपडपट्टी भागात शारदा विद्यालय नावाची शाळा असून शाळेत शेकडो गरीब व गरजू मुले शिक्षण घेत आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात मुलांना थंड व शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी युवानेते बाळा श्रीखंडे यांच्या प्रयत्नाने थंड पिण्याच्या पाण्याचा कुलर शनिवारी दुपारी दिला. 

यावेळी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. पक्षाचे सागर उटवाल, के.डी तिवारी, सुरेश सोनवणे, ज्ञानेश्वर मरसाळे, एल.के.शिंदे, शाळेचे बाळासाहेब शिंदे, प्रकाश जाधव आदीजन उपस्थित होते.

Web Title: On the occasion of Shrikant Shinde's birthday, a water cooler was given to the children of Sarada School, Ulhasnagar