सिलेंडरच्या स्फोटात मायलेकासह वृद्ध महिला जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 20:56 IST2022-08-23T20:56:03+5:302022-08-23T20:56:08+5:30
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिलेंडरच्या स्फोटात मायलेकासह वृद्ध महिला जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
प्रशांत माने
डोंबिवलीः येथील पश्चिमेकडील गायकवाड परिसरातील पारसनाथ इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. यात घरातील मनीषा मोर्वेकर ( वय ६५) यांच्यासह घराजवळून जाणारे उरसुला लोढाया ( वय ४०) आणि रियांश ( वय ५) असे तीघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात बाजुकडील तीन घरांचे नुकसान आहे. मनीषा मोर्वेकर यांच्या घरात हा स्फोट झाला. त्यांच्यासह या घराजवळून पहिल्या मजल्यावर घरी जाणारे उरसुला आणि रियांश हे मायलेक गंभीर जखमी झाले. रियांश हा क्लासवरुन आईसह घरी चालला होता. या घटनेचा तपास विष्णुनगर पोलीस करीत आहेत.