केडीएमसीत आत्ता दर सोमवारी जनता दरबार
By मुरलीधर भवार | Updated: July 1, 2023 15:09 IST2023-07-01T15:09:19+5:302023-07-01T15:09:38+5:30
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्याकरीता दर साेमवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती ...

केडीएमसीत आत्ता दर सोमवारी जनता दरबार
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्याकरीता दर साेमवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती प्रभाग क्षेत्र कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत हा जनता दरबार संपन्न होणार आहे. महापालिकेच्या कार्यलयीन कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी जनतेच्या तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करुन घेणे, नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती स्थानिक स्तरावर देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा विशिष्ट कालावधीत होणे देखील आवश्यक आहे, यासाठी जनता दरबार घेतला जाणार आहे.
या जनता दरबारात कर्मचारी सेवा विषयक बाबी तसेच नागरिकांच्या सर्व तक्रारी घेणे बंधनकारक राहील. संबंधित परिमंडळातील सर्व संबंधित सहा. आयुक्त व इतर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील या वेळी हजर राहणे बंधनकारक राहील. संबंधित विभागीय उपआयुक्त यांच्याकडे तक्रारी/समस्या प्राप्त झाल्यावर त्यापुढील १५ दिवसात त्याचे निराकरण करुन नागरिक/कर्मचारी यांना उत्तर द्यावे असे आयुक्त दांगडे यांनी दिले आहेत.