शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; ऑनलाइन पार पडणार सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 03:13 IST

कमांड सेंटरमध्ये या बाबी हाताळण्यासाठी मोठी व्हिडीओ वॉल उभारली असून त्यावर विविध सॉफ्टवेअर प्रणालींद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे.

कल्याण : स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्र व राज्य सरकार आणि केडीएमसी यांनी उभारलेल्या स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण सोमवारी दुपारी १.१५ च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी ऑनलाईन पद्धतीने दुपारी ११.४५ वाजता बहुचर्चित नवीन पत्रीपुलाचे लोकार्पणही ठाकरे यांच्या हस्ते होईल.

स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर बसविले असून सर्व स्मार्ट प्रणालींचे एका ठिकाणाहून नियंत्रण करणारी ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरातील सुरक्षा नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापनात घंटागाडी वा कचरा गाडीचा मागोवा घेणे, ड्रोनद्वारे पायाभूत सुविधा व्यवस्थापन, ट्रॅफिक सिग्नलचे निरीक्षण व व्यवस्थापन, राज्य सरकारच्या ई-चलनप्रणाली सोबत एकत्रिकरण, स्वयंचलित नंबर प्लेट डिटेक्शन व रेड लाइट उल्लंघन शोधकॅमेऱ्याचे नियंत्रण व व्यवस्थापन, एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली, एलईडी पथदिवे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, चल संदेश बोर्ड व्यवस्थापन, सार्वजनिक सूचना प्रणाली आदी बाबी कमांड सेंटरद्वारे हाताळल्या जाणार आहेत.

कमांड सेंटरमध्ये या बाबी हाताळण्यासाठी मोठी व्हिडीओ वॉल उभारली असून त्यावर विविध सॉफ्टवेअर प्रणालींद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. या विविध प्रणाली हाताळण्यासाठी वर्कस्टेशन व ऑपरेटर यांची व्यवस्था केली आहे. त्यात स्वागतकक्ष, मिटिंग व ट्रेनिंग रूम आणि वॉर रूमचा अंतर्भाव आहे. या सुविधा उपलब्ध होणार असून ही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधेची उपलब्धता डाटा सेंटरमध्ये केलेली आहे.

कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजनस्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्थानक परिसर सुधारणा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यात रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे वाहतूक मार्ग वेगवेगळे करण्यासाठी बैलबाजार चौक ते सुभाष चौक असा उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. अस्तित्वातील बस डेपोची इमारत व कार्यशाळा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार असून या इमारतीवर भव्य वाहनतळ तसेच वाणिज्य संकुल उभारण्यात येणार आहे. रेल्वेस्थानक परिसरातील अपुरी वाहनतळ व्यवस्था विचारात घेऊन सध्याचे मनपाच्या वाहनतळाचाही पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात रेल्वेस्थानक परिसरात सुमारे २५० चारचाकी वाहने व दीड ते दोन हजार दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

रेल्वेस्थानकाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या पादचारी पुलाची दुरुस्ती तसेच स्वयंचलित जिने बसवण्यात येणार आहेत. या सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी १२.४५ च्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे