संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 15:25 IST2022-03-23T15:22:23+5:302022-03-23T15:25:01+5:30

कल्याण : इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू, असे विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी येथील कोळसेवाडी ...

NCP's agitation against Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

कल्याण : इस्लाम धर्म हाच खरा हिंदुस्थानचा शत्रू, असे विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र सचिव शमीम शेख यांनी हा तक्रार अर्ज दिला आहे. भिडे यांनी इस्लाम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी, असे तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, या तक्रार अर्जावर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी गावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भिडे यांनी वरील विधान केले होते.

Web Title: NCP's agitation against Sambhaji Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.