शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी कल्याणमध्ये घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

By मुरलीधर भवार | Updated: April 12, 2024 20:20 IST

नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी, जसा आमचा आग्रह आहे, तोच आग्रह मुख्यमंत्र्यांचाही आहे.

कल्याण- नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. नाशिक जागेवरुन महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी आज पुन्हा गोडसेंनी शिंदेंची कल्याणमध्ये भेट घेतली. खासदारांच्या भेटी मागचे कारण काय, असा प्रश्न गोडसे यांना विचारला असता त्यांनी सांगितेल की, महाविकास आघाडीचे उमेदवार जाहिर झाले. त्यांचा प्रचार सुरु झाल. आमचे शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असले तरी महायुतीचे उमेदवार जाहिर झाल्यास महायुतीच्या उमेदवारांनाही पुरेसा प्रचार करणे सोपे होईल.

खासदार गोडसे यांनी सांगितले की, जागा कुठल्या पक्षाला सुटणार, हाच तिढा अद्याप सुटलेला नाही. आमच्या वरिष्ठांनी सांगितले की, त्यावर बऱ्यापैकी ताेडगा निघालेला आहे. कुठली जागा कुठल्या पक्षाला मिळणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आमचे हेच म्हणणे आहे की, लवकरात लवकर तोडगा निघावा.

जिल्हाध्यक्षही मुंबईत मुख्यमंत्र्याच्या भेटीला आलेले आहे, त्याबाबत काय सांगाल? अशी विचारणा गोडसे यांना केली असता त्यांनी सांगितले की, ही जागा शिवसेनेला सुटते की, अन्य कुठल्या पक्षाला, हे अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. त्यानंतर जो काही निर्णय आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, तो मान्य असेल. 

नाशिकची जागा ही पारंपारिकरित्या शिवसेने लढविली आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीत १ लाख ८७ हजार मतांचे मताधिक्य होते. २०१९ सालच्या लोकसभा निडवणूकीत २ लाख ९३ हजार मतांचे मताधिक्य होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, जसा आमचा आग्रह आहे, तोच आग्रह मुख्यमंत्र्यांचाही आहे, असे गोडसे म्हणाले.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेShrikant Shindeश्रीकांत शिंदेNashikनाशिक